पनीर म्हंटल की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, मात्र, हेच पनीर आरोग्यासाठी हानीकार ठरू शकते.
पनीरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी एकाच वेळी जास्त प्रमाणात पनीर खाणे टाळावे.
अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटीशी संबंधित समस्या असतील तर रात्री झोपताना पनीरचे सेवन करू नये.
जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब वाढू शकतो.
पनीरचे जास्त सेवन केल्याने इंफेक्शनचा धोका वाढू शकतो.
पनीरमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी पनीर खावू नये.
पनीर खरेदी करता ते फ्रेश आहे का पाहताना त्याची शुद्धता देखील तपासावी. कारण, भेसळयुक्त पनीत खाल्ल्याने प्रकृती बिघडू शकते.