आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर मुंबईत 12 कोटींच्या फ्लॅटमध्ये राहातो. त्याची एकूण संपत्ती 58 कोटी रुपये इतकी आहे.


श्रेयस अय्यरला महागड्या बुटांची आवड आहे. त्याने आपल्या शू कलेक्शनचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्याकडे नाईकी, जॉर्डन सारख्या ब्रँडचे अनेक बूट आहेत.


महागड्या बुटांबरोबरच श्रेयस अय्ययरला महागड्या घड्याळ्यांचाही छंद आहे. अय्यरकडे पाटेक फिलिप नॉटिलस ब्रँडचं घड्याळ आहे. त्याची किंमत 5 कोटी 15 लाख इतकी आहे.


पाटेक फिलिप घड्याळ स्विस कंपनीचं आहे. ही कंपनी 1839 पासून घड्याळ बनवते आणि जगभरात या कंपनीचे जवळपास 400 डिस्ट्रीब्यूशन सेंटर्स आहेत.


श्रेयस अय्यरकडे 45 लाखांचंही एक घड्याळ आहे. या घड्याळ्याचं नाव ऑडेमर्स पिगुएट रॉयल ओक कोनोग्राफ असं आहे. हे घड्याळ बनवण्यासाठी एक वर्ष लागतं.


विराट कोली रोलैक्स ब्रँडचं घड्याळ घालतो. या ब्रँडच्या सर्वात महागड्या घड्याळ्याची किंमत 32 लाख रुपये आहे. श्रेयसच्या घड्याळ्यापेक्षा हे घड्याळ खूपच स्वस्त आहे.


श्रेयस अय्यर Boat, Manyavar या ब्रँडच्या जाहीराती करतो. यातून तो जवळपास दोन कोटी रुपयांची कमाई करतो. आयपीएलच्या एका हंगामात तो 12.25 कोटी कमावतो.

VIEW ALL

Read Next Story