चंद्रावर 'कबर' असलेला जगातील पहिला आणि अखेरचा व्यक्ती

Neil Armstrong हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस होता. त्यानंतर आत्तापर्यंत 12 जणांनी चंद्रावर मूनवॉक केला आहे

कबर चंद्रावर आहे

मात्र एक व्यक्ती अशीही आहे जी कधीही चंद्रावर गेली नाही पण त्याची कबर चंद्रावर आहे.

चंद्रावर जमिनी

अनेकांनी चंद्रावर जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र जगात असा एकुलता एक व्यक्ती आहे त्याची चंद्रावर कबर बांधण्यात आली आहे.

महान शास्त्रज्ञ

चंद्रावर कबर बांधण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव यूजीन शूमेकर असं आहे. यूजीन हे महान शास्त्रज्ञ आहेत.

सायन्सच्या नॅशनल मेडलने सन्मानित

यूजीन यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉकर बुश यांनी सायन्सच्या नॅशनल मेडलने सन्मानित केलं आहे

चंद्रावर जाण्याचे स्वप्न

यूजीन यांनी अनेक अंतराळवीरांना प्रशिक्षण दिलं. त्यांनी युरेनियमचाही शोध लावला. यूजीन यांचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न होते.

चंद्राच्या खड्ड्यांचा अभ्यास

शुमेकर यांनी चंद्राच्या खड्ड्यांचा, घाटांचा आणि टेकड्यांचा अभ्यास केला होता. तसंच, त्याचे नामकरणदेखील केले होते.

कार अपघातात मृत्यू

1997साली एका धुमकेतूचा शोध आणि अभ्यास करत असताना त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला.

नासाशी संपर्क

शुमेकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या एका विद्यार्थ्याने नासाशी संपर्क करत त्यांच्या अस्थी चंद्रावर पोहचवण्याची विनंती केली होती.

कबर बांधली

नासाने याला संमती देत 1998 साली लुनार प्रोस्पेक्टरच्या मिशनअंतर्गंत युजीन शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर पोहोचवल्या आणि तिथेच त्यांची कबर बांधली.

VIEW ALL

Read Next Story