यकृत खराब होण्याचे मुख्य कारण मद्य आहे. पण त्याबरोबरोबर असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे यकृत खराब होण्याची शक्यता आहे.
शीतपेयात अतिप्रमाणात साखर असते. त्यामुळे त्यांचे जास्त सेवन यकृतासाठी धोकादायी आहे.
प्रक्रिया केलेल्या मांसात अतिप्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असल्याने त्याचा सतत आहारात सामावेश असल्यास ते यकृतासाठी धोकादायी ठरते.
तळलेल्या पदार्थात सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते. जास्त तेलकट पदार्थांमुळे फॅटी लिव्हरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि साखरेचे अतिप्रमाणात सेवन केल्यास फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
मीठाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरीरात पाणी साठते. ज्यामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो.
लाल मांसात भरपूर प्रोटीन्स असून ते मांसपेशी तयार करण्यास मदत करतात. पण, यांच अतिप्रमाणात सेवन यकृतासाठी धोकादायी आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)