आरोग्य तज्ज्ञानुसार आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉरल असतं. एक चांगले आणि एक खराब असतं.
यामध्ये एकूण कोलेस्ट्रॉरल, कमी घनता लिपोप्रोटीन (LDL), उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) ट्रायग्लिसराइड्स आणि अतिशय कमी घनता लिपोप्रोटीन (VLDL) अशी त्याची गणना होते.
एकूण कोलेस्ट्रॉल 200 mg प्रति dl पेक्षा कमी, LDL कोलेस्ट्रॉल 130 mg प्रति dl पेक्षा कमी, HDL कोलेस्ट्रॉल 40 mg प्रति dl पेक्षा जास्त किंवा तुम्ही स्त्री असल्यास 50 असायला पाहिजे असं डॉक्टर सांगतात.
अशा स्थितीत पहिल्यांदा कोलेस्ट्रॉरलची चाचणी पुरुषांसाठी वयाच्या 35 आणि महिलांसाठी 45 वर्षांपर्यंत करायला हवी.
पण ज्या तरुण वयात लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्या लोकांनी 20 व्या वर्षी कोलेस्ट्रॉरलची चाचणी करावीत.
जर तुमचे LDL 190 mg/dL (4.92 mmol/L) किंवा त्याहून अधिक असेल, तर ते नेहमी खूप जास्त आणि धोकादायक मानलं गेलं आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)