दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी रुग्णांनी नेहमी सोबत इनहेलर ठेवावं.
अनेकदा रूग्णांजवळ इनहेलर नसतं. यावेळी रुग्णाला दम्याचा झटका आला तर काय करावं?
रुग्णाला दम्याचा झटका आल्यावर 'या' गोष्टी केल्या पाहिजेत
झटका आल्यास सर्वप्रथम रुग्णाला सरळ बसवावं. रुग्णाला श्वास घेण्यास सांगा आणि रुग्णाला कोमट पाणी द्या.
दम्याचा झटका असताना रुग्णाला कधीही झोपू देऊ नका.
अशावेळी कोणाकडे इनहेलर असल्यास रूग्णाला ते द्यावं.