हिवाळ्याच्या दिवसांत अनेक घरांमध्ये पौष्टिक लाडू बनवले जातात. पण तुम्ही कधी साखरेचा वापर न करता मखान्याचे लाडू खाल्ले आहेत का?
यासाठी तुम्हाला 2 कप मखाना, 5 खजूर, अक्रोड, वेलची आणि आल्याची पावडर या साहित्याची गरज आहे.
मखाने हलक्या आचेवर छान कुरकुरीत भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
मिक्सरमध्ये अक्रोड वाटून तेल सुटेपर्यंत बारिक पेस्ट तयार करा.
आता मिक्सरमध्ये भाजलेले मखाने, खजूर, वेलची आणि आल्याची पावडर हे सर्व साहित्य घालून एकत्र येईपर्यंत मिक्सर फिरवा.
तयार मिश्रण हाताने लाडूसारखे गोलसर वळा. जर मिश्रण सैल वाटत असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मग लाडू वळा.
हे लाडू दीर्घकाळ टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. त्यांची चव आणि पौष्टिकता दोन्ही चांगल्या प्रकारे टिकून राहील.
या लाडूंमध्ये साखरेचा वापर न केल्याने ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत.
खजुराच्या गोडव्यामुळे लाडूंना नैसर्गिक चव मिळते, ज्यामुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्यपूर्ण पर्याय ठरतात.