मानवी शरीरातील 60 टक्के भाग हे पाणीच असतं. थोडक्यात पाणी शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं.
शरीरातील पाण्याची पातळी खालावल्यास थकवा जाणवून भोवळ येते.
पाणी पिण्यासाठी सर्वजण सोबत पाण्याची बाटली बाळगतात. पण, पाणी नेमकं कोणत्या बाटलीत भरावं माहितीये?
पाणी कायमच स्टीलच्या बाटलीत भरणं योग्य. कारण, स्टीलच्या बाटलीतील पाणी हे रसायनांपासून सुरक्षित असतं.
स्टीलच्या बाटलीतील पाण्याची चव बदलत नाही आणि त्या बाटलीला गंजही चढत नाही.
काचेच्या बाटलीतही पाणी शुद्ध राहतं. शिवाय त्यातही रसायनांचा प्रभाव कमी असतो.
प्लास्टीकच्या बाटलीत कधीच गरम पाणी पिऊ नये. जेव्हा बाटली गरम होते तेव्हा प्लास्टीकमधील घातक तत्त्वं पाण्यात मिसळून ते धोका निर्माण करतात.