तुम्ही सुद्धा तुमच्या विशीतच आहात किंवा वयाची चाळीशी गाठण्याआधीच तुम्हाला पाठदुखीचा त्रास जाणवतोय का? तर यासाठी चार प्रमुख गोष्टी कारणीभूत असतील.
विशीत असलेल्या तरुणांना पाठदुखीचा त्रास जाणवण्यामागील चार कारणं कोणती आहेत याबद्दल एका प्रसिद्ध क्यारोप्रॅक्टरने नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला.
ज्या क्रायरोप्रॅक्टरबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे डॉक्टर हरिष ग्रोव्हर.
क्रायरोप्रॅक्टर म्हणजे तुम्ही इन्स्टाग्रामवर ते हाडं मोडणारे व्हिडीओ पाहता ना त्यामागील स्पेशलिस्ट डॉक्टर असं साध्या भाषेत सांगता येईल.
तर हरिष यांना विशीतील तरुणांमध्ये पाठदुखीचा त्रास वाढत असल्यासंदर्भात एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यामागील कारणं हरिष यांनी सांगितली.
यापैकी पहिलं कारण म्हणजे खूप वेळ बसून राहण्याच्याचा आणि फारशी शारीरिक हालचाल नसलेले लाइफस्टाइल हे आहे.
पाठदुखीचं दुसरं कारण म्हणजे जंक फूड किंवा ज्याला फास्ट फूड म्हणतात त्याचं सेवन करण्याचं प्रमाण वाढलं आहे.
तिसरं कारण म्हणजे व्यायाम न करणे. अनेकजण वेळेच नाही असं कारण देत कर बरेच जण आळसामुळे व्यायाम टाळतात.
चौथं कारण म्हणजे विचार करण्याची चुकीची पद्धत असल्याचं डॉक्टर हरिष यांनी राज शमानी या युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
(Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)