दिवाळीच्या दिवसांमध्ये नरक चतुर्दशी झाल्यानंतर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्यात येतं.
यंदा पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे.
महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.यासाठी संध्याकाळी 05:36 ते 06:16 पर्यंत लक्ष्मी पूजनासाठी फक्त 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल.
धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी दिवाळीच्या संध्याकाळी भ्रमण करायला निघते तेव्हा सूर्यास्तानंतर घराच्या लाईट्स लावा आणि घरात अंधार होणारी नाही याची काळजी घ्या.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी पैशांचा व्यवहार करणे उचित मानले जात नाही. तसेच या दिवशी कोणालाही अगदी छोट्यातली छोटी रक्कम उधार देऊ नका.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तसेच इतर दिवशी देखील संध्याकाळी घर किंवा आजूबाजूच्या परिसरात झाडू काढू नका. कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि पैशांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
लक्ष्मी पूजनच नाही तर दिवाळीच्या इतर दिवसांमध्येही मांसाहार करणे टाळा. अन्यथा गणपती आणि देवी लक्ष्मी नाराज होते.
तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे विशेषतः दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नये.
दिवाळीच्या दिवशी कोणाशीही वाद किंवा भांडण करू नका. तसेच महिलेचा अपमान करू नका.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)