सहसा तज्ज्ञ मंडळी लाल तिखट कमीच खाण्याचा सल्ला देतात. पण, जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आपण तेही विसरून जातो. पण, एक लक्षात घ्या की लाल तिखटामुळं अनेकदा पोटाच्या अल्सरचा धोका असतो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)
अती तिखट जेवणामुळं अपचनाचा त्रास बळावतो. यामुळं सततची जळजळ, अस्वस्थता वाटू लागते. तुम्हालाही हा त्रास असल्यास लाल तिखटाचं प्रमाण कमी करा.
प्रमाणाहून जास्त तिखट पदार्थ खाल्ल्यामुळं अनेकदा अतिसाराचा त्रास होतो. त्यामुळं पोटाला जितकं सोसेल तितकंट तिखट खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. एखाद्या पदार्थामुळं तळून निघालेला मसाला पोटातील अंतर्गत भागाला चिकटून अनेक अडचणी निर्माण करतो.
हाच मसाला आरोग्यासाठी खरंच फायद्याचा आहे का आणि असला तरीही त्याचा अती प्रमाणात होणारा वापर कितपत योग्य? याचा विचार तुम्ही केला आहे का कधी?
डाळीपासून भाज्यांपर्यंत इतकंच काय, तर दहीवड्यामध्ये छान चव आणण्यासाठी त्यावरही हा मसाला भुरभुरला जातो. थोडक्यात मसाला नाही, तर जेवणच नाही असं अनेकांचं मत.
काहींना तर या मसाल्यांचा ठसका इतका आवडतो की, प्रत्येक पदार्थ या मंडळींना प्रमाणाहून जास्त तिखटच लागतो. घाम फुटेपर्यंत तिखट खाणारे भारतात बरेच भेटतील.
भारतामध्ये प्रामुख्यानं वापरात असणारा मसाला म्हणजे लाल तिखट. बेडगी, लवंगी, काश्मिरी, बोर मिरची या आणि अशा अनेक पद्धतींच्या मिरच्यांचे मसाले प्रांताप्रांताच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात.
किंबहुना देशाच्या पूर्वोत्तर भागात, जिथं मसाल्यांचा वापर कमी होतो तिथंच जगातील सर्वात तिखट मिरचीचा वापर जेवणामध्ये केल्याचं पाहायला मिळतं.
जेवणाचं ताट पुढे आल्यानंतर त्यातल्या झणझणीत पदार्थाकडे हात जाणारे तुमच्याआमच्यापैकी अनेकजण आहेत. कारण, मसाला म्हणजे अनेकांसाठी जेवणाची खरी चव.
मसाल्याची ठकसेबाज फोडणी पडेल महागात , पाहा अती तिखट खाण्याचे गंभीर परिणाम