10 अशी मंदिरे ज्यांना आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी

पंचमुखी हनुमान मंदिर

कराची जवळ हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हे मंदिर अंदाजे 1500 वर्ष जुने आहे. मूर्ती स्वयंभू आहे असे मानले जाते.

कटास राज मंदिर

हे मंदिर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात आहे. मंदिराभवती असणारं सरोवर पवित्र मानले जाते. हे शंकराचे मंदिर आहे.

हिंगलाई देवी मंदिर

पाकिस्तानातील बलोचिस्थानात हे मंदिर स्थित आहे. मंदिरात सती देवीची आरासना केली जाते. पाकिस्तानात असलेल्या तीन शक्तीपिठांपैकी एक हे आहे.

रामनाथस्वामी मंदिर

हे मंदिर रामेश्वरम् मध्ये आहे. या मंदिराची आभा फार शक्तिशाली मानली जाते. भक्तांना मंदिरात बसून उपासना करायला आवडते.

अमरनाथ मंदिर

हे मंदिर गुहेत आहे. देऊळ बर्फापासून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शिवलिंगासाठी सुप्रसिद्ध आहे. ही जागा फार पवित्र आणि अध्यात्मिक मानली जाते.

काशी विश्वनाथ मंदिर

हे मंदिर वाराणसीमध्ये आहे. भारतात असलेल्या अनेक आदरणीय आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक आहे. हे मंदिर फार शक्तिशाली आहे असे मानले जाते. संपुर्ण जगभरातील भक्त येथे येतात.

श्री सिद्धिविनायक मंदिर

मंबईतील हे मंदिर गणपतीचे आहे. मंदिरात दूर-दूर वरुन भक्त येतात. येथील वातावरण फार प्रसंन्न आणि भक्तीमय असल्याने भाविक गर्दी करतात.

महाकालेश्वर मंदिर

हे मंदिर उज्जैनमध्ये असून शंकराचे आहे. असे म्हणतात की शंकराने महाकाल अवतार घेतल्यानंतर हे मंदिर निर्माण झाले. महाकाल हे फार शक्तीशाली दैवत आहे.

कालभैरव मंदिर

हे मंदिर वाराणसी येथे आहे. मंदिर शक्तिशाली मानले जाते. देऊळ शंकराचे आहे. असे मानले जाते की मंदिर ब्रम्हा आणि विष्णूच्या भांडणादरम्यान तयार झाले

कसार देवी मंदिर

हे मंदिर अलमोरामध्ये आहे. हे देऊळ वैज्ञानिक आणि पौराणिक या घटकांचा मध्यबिंदू मानले जाते. हे मंदिर भूचूंबकीय तत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे मंदिरशास्त्र आणि विज्ञान यांचे उत्तम उदाहरण आहे.

VIEW ALL

Read Next Story