ऑक्टोबर महिना संपत असतानाच आता गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे.

Oct 28,2023


वातावरणातील या सुखद गारव्यात कुठेतरी मस्त फिरायला जायची इच्छा आता सर्वांनाच होऊ लागली असेल.


तुम्हीही जर फिरायला जाण्यासाठी अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात असाल, तर आम्ही घेऊन आलो आहोत हिवाळ्यातील ट्रेकला जाण्यासाठीचे 5 उत्तम पर्याय.

चद्दर ट्रेक

लडाखमधील झंस्कार नदी हिवाळ्यात अशी काही गोठते की त्यावर आपण चक्क चालत जाऊ शकतो. थंडीमध्ये या नदीवर बर्फाची चादर तयार होते. म्हणून यावर होण्याऱ्या ट्रेकला 'चद्दर ट्रेक' म्हणतात.

हर की दून

कोटगाव, उत्तराखंडमधील हर की दून ट्रेक आतापर्यंत फार कमीजणांनी एक्सप्लोर केला आहे. या भागात तुम्हाला पक्षी आणि प्राणी बघायला मिळतील. येथे तुम्हाला माकडाची एक खास प्रजातीही पाहायला मिळेल आणि काळे हरिण दिसण्याचीही शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला येथे अस्वल आणि बारशिंग्यासारखे प्राणीही पाहायला मिळतील. हे ठिकाण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे.

रूपकुंड ट्रेक

रूपकुंड ट्रेक उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. येथे दाट जंगले आहेत. असे म्हणतात की ही जागा बर्‍यापैकी रहस्यमय आहे. आजूबाजूच्या पर्वतांच्या दऱ्यामुळे हे ठिकाण आणखी नेत्रदीपक बनले आहे. काहींनी केलेल्या दाव्यानुसार याच मार्गावर तुम्हाला मानवी सापळेही दिसतात.

ब्रम्हताल ट्रेक

हे हिमालयाच्या मधोमध वसलेले आहे आणि बर्फाच्या चादरीने झाकलेले एक तलाव आहे. ब्रह्मताल ट्रेक तुम्हाला सुंदर दऱ्या, शांत वस्ती, नद्या आणि ओकच्या जंगलांमधून घेऊन जातो. हिवाळ्यात, हा परिसर बर्फाने झाकलेला असतो, तेथून हिमालयाचे सौंदर्य पाहणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो.

दायरा बुग्याल

आजवर फार कमी लोकांनी दायरा बुग्याल ट्रेक पाहिला असेल. हा ट्रेक उत्तराखंडमधील रैथलमध्ये गंगोत्रीच्या प्रदेशात येतो. दायरा बुग्यालचा नजारा पाहून तुमच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाहीत. येथे ट्रेकिंग करणे तसं कठीण काम नाही, त्यामुळे तुम्ही कुटुंबासह याचा आनंद घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story