देशात ही सर्विस उपलब्ध..

मात्र, लक्षात ठेवा की ही सर्विस सध्या संपूर्ण देशात उपलब्ध नाही. ठराविक राज्यातील नागरिक या सर्विसचा लाभ घेऊ शकतात. लवकरच संपूर्ण देशात ही सर्विस उपलब्ध होईल.

नंबर ब्लॉक करू शकता

यासाठी तुम्हाला त्या नंबरच्या समोर दिलेल्या ब्लॉक आणि रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ही सर्विस सध्या संपूर्ण देशात उपलब्ध नाही.

सर्व फोन नंबरची लिस्ट दिसेल

OTP व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित सर्व फोन नंबरची लिस्ट येथे दिसेल. जर एखादा अनोळखी नंबर असल्यास तुम्ही तो बंद करण्यासाठी विनंती देखील करू शकता.

या वेबसाइटवर जावे?

यासाठी तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in/ च्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका. तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल.

किती जणांनी सिम कार्ड घेतले?

तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम कार्ड घेतले आहे. हे जाणून घेण्यासाठी DoT ची मदत घ्या. या पोर्टलला टेलिकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर किंवा TAFCOP नाव देण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्हाला आधारवर जारी सिम कार्डची माहिती मिळेल.

VIEW ALL

Read Next Story