महिंद्रा अँड मिसेस महिंद्रा

Mahindra and Mahindra उद्योग समुहानं देशातील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. अशा या उद्योगसमुहामध्ये सध्या सर्व महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत, आनंद महिंद्रा.

अनुराधा महिंद्रा

तुम्ही आनंद महिंद्रा यांच्याविषयी तर ऐकलं असेल. पण, त्यांच्या पत्नी अनुराधा महिंद्रा यांच्याविषयी कधी ऐकलंय का? आनंद महिंद्रा यांची अनुराधा यांच्याशी पहिली भेट अवघ्या 17 व्या वर्षी झाली होती.

पहिली भेट

मध्यप्रदेशातील इंदौर येथे ही भेट झाली होती. ज्यावेळी आनंद महिंद्रा एका स्टुडंट फिल्म प्रोजेक्टसाठी तिथं पोहोचले होते. पहिल्याच भेटीमध्ये आनंद महिंद्रा यांच्या मनात अनुराधा यांनी घर केलं आणि त्यांनी फिल्मी अंदाजाच त्यांना प्रपोज केलं

फिल्मी प्रपोज

प्रपोज करताना महिंद्रा यांनी अनुराधा यांना स्वत:च्या आईची अंगठी दिली होती. पुढे महिंद्रा यांनी एका सेमिस्टरसाठी शिक्षणातून वेळ काढला आणि 17 जून 1985 ला अनुराधा यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ते दोघंही पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. जिथं अनुराधा यांनी शिक्षण पूर्ण केलं.

मासिकाची सुरुवात

यानंतर Man`s World नावाचं एक मासिक अनुराधा यांनी सुरु केलं आणि ते भारतात प्रचंड लोकप्रिय झालं. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

समाजकार्य

सध्या त्याच अनुराधा महिंद्रा गरजू मुलांसाठी मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. KC Mahindra Trust च्या माध्यमातून त्या ही मदत करताना दिसतात.

कमाल जोडपं

अशी आहे 17 व्या वर्षापासून प्रेमाचा प्रवास करत आदर्श जोडपं म्हणून सर्वांच्याच मनात घर करणाऱ्या आनंद महिंद्रा यांची कमाल Love Story.

VIEW ALL

Read Next Story