गरीबी रेषेखाली असलेल्या नागरिकांसाठी सरकार विविध योजना राबवत असते. बीपीएल कार्ड यापैकीच एक योजना आहे.
गरीबी रेषेखाली असलेल्यांना बीपीएल कार्ड बनवता येते. अर्जदाराचे वय 18 वर्षे असावे तसेच परिवाराचे उत्पन्न 20 हजारपेक्षा कमी असावे.
बीपीएल कार्डसाठी खाद्य विभागाची वेबसाइट https://mahafood.gov.in/ वर अर्ज करता येतो. तसेच स्थानिक कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो.
बीपीएल कार्ड धारकाला आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, विद्यार्थी योजनेसहित अनेक योजनांचा लाभ मिळतो.
BPL कार्डधारकांना बॅंकेत कमी व्याजदराने कर्ज मिळतं. सरकारी योजनांचे फायदे मिळतात.
BPL रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाच्या नावे असतं. कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बील द्यावे लागते.
BPL कार्ड बनवण्यासाठी श्रमिक किंवा जॉब कार्ड, पासपोर्ट साइज फोटो,मोबाईल नंबर याची आवश्यकता असते.