Budget 2024: भारत शेजाऱ्यांना 4033+ कोटी! 'या' एका देशाला मिळणार तब्बल 2068 कोटी

Swapnil Ghangale
Jul 26,2024

अर्थमंत्र्यांनी सादर केला अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेमध्ये देशाचा 2024-25 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

शेजारच्या देशांना देणार कोट्यवधी रुपये

अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये भारत मित्र देशांना किती निधी मदत अथवा व्याज म्हणून देणार आहे याचा आकडा जारी करण्यात आला.

या देशाला देणार 245 कोटी

यानुसार भारत श्रीलंकेला यंदाच्या आर्थिक वर्षात 245 कोटी रुपये निधी देणार आहे.

या देशाला मिळणार 250 कोटी

भारत सर्वाधिक निधी देणाऱ्या मित्र देशांच्या यादीत म्यानमार पाचव्या स्थानी असून यंदाच्या वर्षी या देशाला भारताकडून 250 कोटी रुपये दिले जातील.

या देशाला देणार 370 कोटी

मॉरिशिअलसलाही भारत मोठी मदत करणार आहे. भारत या छोट्याश्या देशाला 370 कोटी रुपयांची मदत करणार आहे.

वाद झालेला देश तिसऱ्या स्थानी

या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी भारताबरोबरच्या वादामुळे चर्चेत असलेला मालदीव हा देश आहे. भारत मालदीवला 400 कोटी रुपये देणार आहे.

सर्वाधिक निधी मिळवणाऱ्या देशांच्या यादीत 'हा' देश दुसऱ्या स्थानी

भारत सर्वाधिक निधी देणाऱ्या देशांच्या यादीत नेपाळ दुसऱ्या स्थानी आहे. या देशाला भारत 700 कोटींची मदत करणार आहे.

2 हजार 68 कोटी 56 लाखांची मदत

भारत सर्वाधिक आर्थिक मदत ज्या देशाला करणार आहे त्याला मदत म्हणून तब्बल 2 हजार 68 कोटी 56 लाखांची मदत दिली जाणार आहे.

2200 कोटींहून अधिक पैसा या देशाला देणार

भारत ज्या देशाला दोन हजार कोटींहून अधिक निधी देणार आहे त्या देशाचं नाव आहे भूटान!

एकूण रक्कम 4033 कोटी

या सहा देशांना भारताकडून दिली जाणारी एकूण रक्कम 4033 कोटींहून अधिक आहे.

VIEW ALL

Read Next Story