भारतात सर्वात स्वस्त ड्रायफ्रूट्स कुठे मिळतात?

शरीर आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो.

असं असलं तरी सुका मेवा विकत घेणं सर्वांनाच परवडत असं नाही.

बाजारात काजू 800 ते 1 हजार रुपये किलो इतक्या किंमतीत मिळतात.

भारतात एक जागा अशीदेखील आहे, जिथे स्वस्त काजू मिळतात.

भारतात सर्वात स्वस्त काजू झारखंडमध्ये मिळतात.

झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात 30 ते 40 रुपये किलो दराने तुम्ही काजू घेऊ शकता.

झारखंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काजूची लागवड होते.

जामताडाच्या नाला गावात साधारण 50 एकर जमिनीत काजूची लागवड केली जाते.

जामताडामध्ये काजूच्या मोठमोठ्या बागा आहेत.

संथाल परगानामध्ये मोठ्या प्रमाणात काजूची शेती केली जाते.

VIEW ALL

Read Next Story