नुकतीच भारतातील 100 श्रीमंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.
तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती असेल, पण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव तुम्हाला माहीत आहे का?
आम्ही पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला सहाव्या क्रमांकावर आहेत.
1966 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत.
सीरम दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते.
फोर्ब्सच्या मते, सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती $20.9 अब्ज आहे.
कोविड लस तयार करण्यात कंपनीची मोठी भूमिका आहे.
अदार पूनावाला यांच्या कंपनीने कोविड-19 लस तयार करण्यासाठी नवीन कारखाना तयार करण्यासाठी $800 दशलक्ष गुंतवणूक केली होती.
त्यांनी बनवलेली लस Covishield ही महामारीच्या काळात भारतात सर्वाधिक वापरली गेली.