आपण अनेकदा विमानातून प्रवेश करत असताना एयर हॉस्टेस आपलं स्वागत करण्यासाठी उभ्या असतात. पण तुम्हाला खरं कारण काय असतं माहितीये का?
पाहुण्याचं स्वागत करणं आपली परंपराच राहिलीये. असंच जेव्हा आपण विमानात प्रवेश करतो, त्यावेळी एयर हॉस्टेस दरवाजाजवळ आपलं हसून स्वागत करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की एयर हॉस्टेस असं का करतात ?
आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की प्रवाशांना प्रवासात आनंदी आणि फ्रेश राहण्यासाठी स्वागत केलं जातं, पण असं काही नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की याचं कारण काही वेगळंच आहे.
हंगेरियन एयरलाइन्स wizz air मध्ये काम करणारी फ्लाइट अटेंडेंट रानियाने यावर सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट तब्बल 62 लाखापेक्षा जास्त वेळा पाहण्यात आली. त्यावेळी तिने खरं कारण सांगितलं.
फ्लाइट अटेंडेंट रानियाने असं सांगितलं की गेटवर केलं जाणारं स्वागत हे, कोणत्या प्रवाशाने दारू प्यायली नाही ना? किंवा प्रवासी आजारी तर नाही हे तपासण्यासाठी केलं जातं.
यादरम्यान स्क्रिनिंग देखील केलं जातं कारण आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोण मदत करू शकेल अशा एयर हॉस्टेसला नेमणूक केली जाते.
याव्यतिरिक्त लहान मुलं, वृद्ध आणि मानसिक त्रास असलेल्या प्रवाशांना आपत्कालीन दरवाजा जवळ जागा दिली जात नाही. अशाप्रकारे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.
फ्लाइट अटेंडेंट रानियाचा पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर एका यूजर असे लिहिलं आहे की, फ्लाइट अटेंडेंट लोकांना जज करतात, तर एकाने असं लिहीलं आहे की ही पूर्णपणे प्रवाशांची फसवणूक आहे.