कलाजगतापासून राजकारणाकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या गायत्री बिष्णोई यांच्याच नावाची सध्या प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.
वर्षभरापूर्वीच त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. ज्यानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.
एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करण्यासोबतच त्यांनी मुंबईत चित्रपट निर्मिती संस्था आणि एमटीवीसाठी काम केलं होतं.
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील भलीसर हे त्यांचं लहानसं गाव. बिष्णोई यांनी एक पत्रकार म्हणूनही नोकरी केली होती.
गायत्री बिष्णोई असं त्यांचं नाव. 'आप' पक्षात त्या सध्या महिला विंगच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
ही तरुणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली आहे. निमित्त ठरतं ते म्हणजे त्यांची राजकारणातील एंट्री.