जर तुम्ही चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल एक उत्तम पर्याय आहे
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत (NSC) 5 वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी मॅच्युरिटीवर 7.7 टक्के व्याज मिळू शकेल.
या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीसाठी मर्यादा नाही. आर्थिक उत्पन्नानुसार तुम्ही गुंतवणूक करू शकता.
जर तुम्ही 1 लाख रूपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 5 वर्षात 44,903 रूपये व्याज आणि एकूण 1.44 लाख रूपये इतकी रक्कम मिळते.
तुम्ही 5 लाख रूपये गुंतवणूक केली, तर 5 वर्षात व्याजाच्या स्वरूपात 2.44 लाख रूपये मिळतात आणि एकूण 7.24 लाख रूपये इतकी रक्कम मिळते.
10 लाखांची गुंतवणूक केली, तर 5 वर्षामध्ये 4.49 लाख रूपये व्याज मिळते आणि एकूण 14.49 लाख रूपये रक्कम मिळते.
20 लाखांची गुंतवणूक केली, तर 8.98 लाख रूपये व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम 28.98 लाख रूपये रक्कम दिली जाते.
30 लाखांची गुंतवणूक केली, तर 13.47 लाख रूपये व्याज आणि मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम 43.47 लाख रूपये इतकी रक्कम मिळते.
5 वर्षासाठी 40 लाख रूपये गुंतवण्यात आले, तर एकूण 57.96 लाख रूपये इतका फंड जमा होतो.
तुमचे वार्षिक उत्पन्न चांगले असेल, तर 50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण रक्कम 72.45 लाख रुपये इतकी मिळेल आणि त्यावर 22.45 लाख रूपये इतके व्याज मिळू शकेल.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) केंद्र सरकारची योजना असून गुंतवणूक करणाऱ्यांना टॅक्समधून सुट दिली जाते.