लग्नानंतरही मुलीला वडिलांच्या जागी नोकरीचा हक्क, कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल


राज्यातील सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.


आता लग्नानंतरही मुलींना अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी नोकरी मिळणारेय.


मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला वडिलांच्या जागी नोकरीचा हक्क मिळत नव्हता. मात्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं याबाबत एक महत्त्वाचा निकाल दिलाय.


विवाहित मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारणं असंवैधानिक असल्याचं कोर्टानं म्हटलंय.


त्यामुळे आता लग्न झाल्यानंतरही वडिलांच्या जागी मुलींना नोकरीचा हक्क मिळालाय.


वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये काम करणा-या राजू उसरे या कर्मचा-याच्या मुलीच्या बाबतीत निकाल देताना खंडपीठानं हा निकाल दिलाय.


उसरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या विवाहित मुलीनं नोकरीसाठी अर्ज केला होता.


मात्र वकिलांकडून तो नाकारण्यात आला. त्याविरोधात या मुलीनं कोर्टात दाद मागीतली होती.

VIEW ALL

Read Next Story