आधार कार्ड किती वेळा अपडेट करता येतं?
Aadhar Card : देशात सध्या आधार कार्डला अतिशय महत्त्वं असून अनेक ठिकाणी तो महत्त्वाचा पुरावा ग्राह्य धरला जातो.
भारतीय नागरिकांकडे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड असणं अनेक ठिकाणी बंधनकारक आहे.
या आधार कार्डमध्ये काही महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बदल केले जाणंही तितकंच महत्त्वाचं. पण, त्यासाठीही एक मर्यादा आहे.
आधार कार्डवर तुम्ही नाव बदलू इच्छित असाल तर तुम्ही ही प्रक्रिया फक्त दोनदा करु शकता.
आधार कार्डवर तुम्ही जन्मतारीख फक्त एकदा बदलू शकता. तर, लिंगही एकदाच बदलू शकता.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांक असणं गरजेचं. तुम्ही वारंवार आधार कार्ड अपडेट करू शकत नाही ही बाब लक्षात घ्या.