लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सर्वांच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीये.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येईल, यावर निवडणूक आयोगाने नवी मर्यादा आखली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला 95 लाख रूपये खर्च करता येणार आहे. याआधी 2014 च्या निवडणुकीमध्ये खर्चाची मर्यादा ही 70 लाख होती.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्य स्तरावर आणि जिल्हास्तरावर माध्यम नियमनाची माहिती आढल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्शन कमिशनने दिली आहे.
लोकसभासोबत अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही लोकसभेसोबत होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांला 40 लाख रुपये खर्च करता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार असून 19 फेब्रुवारी रोजी मतदानाला सुरूवात होईल.