12 पास असणाऱ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरी करण्याची उत्तम संधी. नौदलाने जुलै 2025 बॅचसाठी अधिसूचना जारी केली आहे.
देशसेवेचे स्वप्न पाहणारे भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट - joinindiannavy.gov.in वर अर्ज करू शकतात.
2025 च्या भरती मोहिमेद्वारे कार्यकारी आणि तांत्रिक बॅचच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या उमेदवारांनी नावनोंदणी करून JEEMAIN 2024 च्या प्रवेश परीक्षेला बसले पाहिजे. यामध्ये त्यांना 70% गुणांसह 12 वी पास असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराची किमान उंची 157 सेमी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जानेवारी 2006 आणि 01 जुलै 2008 दरम्यान झालेला असावा.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 6 डिसेंबर रोजी सुरु झाली असून ती 20 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे. यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.