सुंदर पिचाई हे 'अल्फाबेट गुगल'चे सीईओ आहेत. त्यांना गेल्या वर्षी तब्बल 226 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1800 कोटी रुपये) पगार मिळाला होता. (फोटो: Sundar Pichai/Facebook)
सत्या नडेला हे 'मायक्रोसॉफ्ट'चे सीईओ आहेत. कंपनीच्या 40 वर्षांच्या इतिहासात हे प्रतिष्ठित पद भूषवणारे ते तिसरे व्यक्ती ठरले आहेत. (फोटो: Satya Nadela/LinkedIn)
नील मोहन हे यूट्यूबचे सीईओ आहेत. नील मोहन हे 23 अँड मी, बायो-टेक कंपनी आणि स्टिच फिक्स कंपनीच्या बोर्डावर देखील आहेत. (फोटो : Neal Mohan/LinkedIn)
शंतनू नारायण हे 'Adobe' चे सीईओ आहेत. शंतनू नारायण हे जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. (फोटो: adobe.com)
अजय बंगा हे ‘वर्ल्ड बँक ग्रुप’चे सीईओ आहेत. 2016 मध्ये भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. (फोटो: World Bank/Facebook)
अरविंद कृष्णा 'IBM' चे सीईओ आहेत. आपल्या अनोख्या कल्पनांसाठी प्रसिद्ध असलेल्या अरविंद कृष्णा यांच्याकडे 15 पेटंट आहेत. (फोटो: Arvind Krishna/LinkedIn)
जयश्री उल्लाल या 'अरिस्ता नेटवर्क्स'च्या सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.5 अब्ज डॉलर आहे. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट असलेल्या चार महिलांपैकी ती एक आहे. (फोटो : calstate.edu)
लक्ष्मण नरसिंहन हे स्टारबक्सचे सीईओ आहेत. कंपनी त्यांना सुमारे 10.37 कोटी रुपयांचे पॅकेज देत आहे. (फोटो - Laxman Narasimhan/LinkedIn)
रवी कुमार एस हे 'कॉग्निझंट'चे सीईओ आहेत. रवी यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात अणुशास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो : Ravi Kumar S/LinkedIn)