रेल्वेनं प्रवास करतेवेळी 'या' सुविधांसाठी नाही मोजावा लागत एकही रुपया

AC कोच

AC कोचमध्ये प्रवाशांना रेल्वेकडून चादर, उशी, दोन बेडशीट, हँड टॉवेल या सुविधा मोफत दिल्या जातात.

आपात्कालीन स्थिती

आपात्कालीन स्थितीमध्ये रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी डॉक्टर आणि वैद्यकिय मदत मोफत दिली जाते.

जेवण

राजधानी आणि दुरन्तोसारख्या प्रिमियम रेल्वेनं प्रवास केल्यास जेवण मोफत दिलं जातं. 6000 हून अधिक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत वायफाय सुविधा असते.

लॉकर

महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी मोफत लॉकर सुविधा दिली जाते. इथं महिनाभरही सामान ठेवता येतं. शिवाय प्रवासी तिकीट दाखवून फुकटात वेटिंग रुममध्ये थांबू शकतात.

चार्जिंग

रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या वतीनं प्रवाशांसाठी मोफत मोबाईल चार्जिंग सुविधा असते.

पिण्याचं पाणी

रेल्वे बोगीमध्येही ही सुविधा असते. शिवाय प्रवाशांना तिकीटाच्याच दरात पिण्याचं पाणीही मोफत दिलं जातं.

VIEW ALL

Read Next Story