रेल्वे तिकिट हरवले,फाटले तर काय करायचे? नियम जाणून घ्या

प्रवासादरम्यान रेल्वेचे तिकीट हरवले किंवा फाटले तर आपण खूप टेनशनमध्ये येतो. आता इतक्यातच टीसी आला तर आपल्याला मोठा दंड लावेल अशी भीती आपल्याला वाटते.

पण यासंदर्भातील रेल्वेचा नियम काय सांगतो? हे तुम्हाला माहिती आहे का?

डुप्लिकेट तिकिटे बनवण्याचे नियम आणि शुल्क वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळे आहेत.

प्रवासी ट्रेनमध्ये टीटीईकडे जाऊन डुप्लिकेट तिकीट बनवू शकतात. इतकेच नाही तर प्रवाशाला तिकीट काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट मिळू शकते.

तिकिट हरवल्यास प्रवाशाला फार काळजी करण्याची गरज नाही. तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट बनवून तुम्ही प्रवास करू शकता. डुप्लिकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल.

सेकंड आणि स्लीपर क्लाससाठी डुप्लिकेट तिकीट बनवण्यासाठी 50 रुपये मोजावे लागतात. वरील श्रेणीसाठी डुप्लिकेट तिकिटे बनवण्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क द्यावे लागेल.

आरक्षण चार्ट तयार केल्यानंतर जर कन्फर्म केलेले तिकीट हरवले असेल, तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट काढण्यासाठी भाड्याच्या 50% रक्कम भरावी लागेल.

तुमचे हरवलेले मूळ तिकीट सापडल्यास तुम्ही डुप्लिकेट तिकिटासाठी दिलेली दोन्ही तिकिटे ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे काउंटरवर दाखवून परत मिळवू शकता.

जर एखाद्या प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाल्यानंतर फाटले तर त्याला 25 टक्के भाडे भरल्यानंतरच डुप्लिकेट तिकीट मिळेल. वेटींग लिस्टवर असलेले फाटलेले तिकीट हरवले तर तुम्ही डुप्लिकेट तिकीट बनवू शकत नाही.

VIEW ALL

Read Next Story