मनसोक्त फिरूनही पैसे उरतील; IRCTC चं किफायतशीर नेपाळ टूर पॅकेज

Published by: Zee Team | Feb 12, 2024

भटकंती

भटकंती करत नवनवीन प्रदेशांना भेट देण्याची तुमचीही इच्छा असेल तर नेपाळ एक उत्तम पर्याय आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

नेपाळ

नेपाळमध्ये निसर्गसौंदर्यासोबतच काही सुरेख मंदिरंही आहेत. या देशात तुम्ही फेब्रुवारी ते मार्चदरम्यानच्या कालावधीत पर्यटनासाठी येऊ शकता.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

IRCTC

IRCTC सध्या तुम्हाला नेपाळ भ्रमंतीची संधी देत आहे. इथं तुम्ही दिल्ली ते नेपाळ असा प्रवास करु शकता. या पॅकेजमध्ये तुम्ही काठमांडू, पोखरा अशा ठिकाणांना भेट देऊ शकता.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

प्रवासासाठीची विमान तिकीटं

6 दिवस आणि 5 रात्रींसाठीच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला दिल्ली ते काठमांडू प्रवासासाठीची विमान तिकीटंही देण्यात येणार आहेत. या सफरीमध्ये तुम्ही पशुपतीनाथ मंदिरालाही भेट देऊ शकता.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

Best of nepal

Best of nepal Ex Delhi (No 04) असं या पॅकेजचं नाव. 16 फेब्रुवारी आणि 28 मार्च अशा दिवशी ही टूर निघणार आहे. ज्यासाठी माणसी खर्च 36500 रुपये इतका असेल.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

एकूण खर्च

दोन व्यक्ती एकत्र प्रवास करत असल्यास त्यांना माणसी 37000 रुपये भरावे लागणार आहेत. 5 ते 11 वर्षांच्या मुलांसमवेत प्रवास करत असाल तर 26500 रुपये इतका जास्तीच्या बेडचा दर आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

VIEW ALL

Read Next Story