भारतात नद्यांना मातेचा दर्जा दिला जातो. हिंदू धर्मात नद्यांना पवित्र मानले जाते. मात्र, देशात अशीही एक नदी आहे जिला अपवित्र मानले जाते.
भारतात नद्यांची पूजा केली जाते. खास उत्सवकाळात नदीत स्नानकरणे पवित्र मानले जाते. मात्र, या नदीच्या पाण्याला स्पर्श करायलाही लोक धजावत नाहीत. या नदीत स्पर्श करणे अशुभ मानले जाते. कुठे आहे ही नदी आणि काय आहे याची आख्यायिका जाणून घ्या
बिहार आणि उत्तर प्रदेश जिल्ह्यातून ही नदी वाहते. या नदीचे नाव कर्मनाशा नदी असे आहे. बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून या नदीचा उगम झाला आहे.
कर्म आणि नाशा या शब्दांना जोडून कर्मनाशा हे नाव तयार झाले आहे. कर्मनाशा म्हणजे काम बिघडवणारी. असं म्हणतात कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श करताच काम बिघडतात तसंच, चांगली कर्मही नष्ट होतात.
पौराणिक कथेनुसार ही नदी शापित आहे. राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांनी एकदा त्यांचे गुरु वशिष्ठ यांच्याकडे स्वदेही स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांनी नकार दिला.
त्यानंतर राजा सत्यव्रत यांनी विश्वमित्र यांच्याकडे आग्रह धरला. विश्वमित्र सत्यव्रत यांना स्वग्रही स्वर्गात नेले. मात्र, हे पाहून इंद्रदेव क्रोधित झाले.
इंद्रदेवांनी राजा सत्यव्रत यांचे डोके धरतीच्या दिशेने व पाय स्वर्गाच्या दिशेने अशा स्थितीत पृथ्वीवर परत पाठवले. मात्र, विश्वमित्रांनी त्यांच्या तपोबलाने राजा सत्यव्रत यांना धरती आणि स्वर्गाच्या मध्येच अडवून ठेवले आणि देवतांसोबत युद्ध केले.
राजा सत्यव्रत बराच वेळ अशा उलट्या अवस्थेत अवकाशात लटकत होते. त्यावेळी त्यांच्या तोंडातून लाळ खाली पडली. आणि त्याच लाळेमुळं नदी प्रवाहित झाली. तर, त्याचवेळी ऋषी वशिष्ठांनी राजा सत्यव्रत यांना शाप दिला.
राजाला मिळालेल्या शापामुळं आणि त्याला लाळेपासून नदी तयार झाल्यामुळं या नदीला शापित मानले जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)