तुमचा पार्टनर समजदार की बालीश? 'असे' ओळखा!

पार्टनरने आपल्यावर खूप प्रेम करायला हवं, असं प्रत्येक मुलीला वाटतं. पण प्रेम यशस्वी होण्यासाठी समजदारी हवी.

तुमचा पार्टनर समजदार आहे की बालिश? हे कसं ओळखायचं?

प्रेमात विश्वास आणि सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची असते. तो समजदार असेल तर दुसऱ्या कोणत्या महिलेशी संपर्क ठेवणार नाही. जिच्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटेल.

सर्व मुलींपासून त्याने दूर रहावं असे नाही. पण प्रत्येकीपासून ठराविक अंतर राखावं.

समजदार पार्टनर चूक मान्य करायला घाबरत नाही. माफी मागून प्रश्न सुटत असेल तर तो तसे करायला मागे हटत नाही.

पार्टनर सर्व चुकांची जबाबदारी तुमच्यावरच टाकत असेल तर तो समजदार नाही.

पार्टनर समजदार असेल तर तुम्ही पाठवलेला मेसेज दुर्लक्षित करणार नाही. व्यस्त असेल तर तसं तो सांगेल.

भांडण सगळ्या नात्यात होतात. पण समजदार पार्टनर लवकर भांडण मिटवतात.

समजदार पार्टनर आपल्या इच्छा दुसऱ्यावर थोपवत नाही.

VIEW ALL

Read Next Story