सध्या पुण्यात पोर्शे कारच्या धडकेत 2 जणांनी प्राण गमावल्याच्या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. या प्रकरणात आरोप असलेला मुलगा हा अल्पवयीन असल्याने यामुद्द्यावरुन राजकारण बरेच तापले आहे.
19 मे रोजी झालेल्या अपघातानंतर या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये विशेष वागणूक मिळाल्याची चर्चा आहे. मात्र पोलीसांनी असं काहीही केल्याचं आढळल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे.
पण तुम्हाला ठाऊक आहे का कायद्यानुसार काही व्यक्तींना पोलीस स्टेशनला बोलावण्याचा अधिकार अगदी पोलिसांनाही नाही. याचसंदर्भात एका वकिलानी दिलेली माहिती जाणून घेऊयात.
क्रिमिनल कोड प्रोसिजरच्या कलम 160 नुसार पोलिसांना 4 प्रकारच्या व्यक्तींना पोलीस स्टेशनला बोलावता येत नाही.
इन्स्टाग्रामवर कायद्यासंदर्भात माहिती देणाऱ्या दीप सोमानी या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, कलम 160 नुसार महिलांना पोलीस स्टेशनला बोलावण्याचा पोलिसांना अधिकार नाही.
तसेच 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना पोलीस स्टेशनला या असं पोलीस सांगू शकत नाही.
त्याचप्रमाणे 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्याची परवानगी नसते. (प्रातिनिधिक फोटो - सौजन्य पीटीआय)
शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या तसेच मानसिक समस्या असलेल्या लोकांनाही पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही.
यासंदर्भात दीप सोमानीने पोस्ट केलेलं एक रील सध्या व्हायरल झालं आहे.
या चार व्यक्तींची चौकशी करायची असेल तर पोलिसांना त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटावे लागते किंवा विशेष परवानगी घेऊन कोणाच्या तरी सोबतीने अथवा काही अटी, शर्थींची पूर्तता करुन त्यांना पोलीस स्टेशनला बोलवावं लागतं.