Tourist Places in Monsoon : पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचाय? 'या' ठिकाणांना अवश्य भेट द्या
Monsoon Tourist Places in India : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, देशातील काही ठिकाणांना तुम्ही भेटी देऊ शकता. त्यासाठी तुमच्या टुरिस्ट लिस्टमध्ये ही ठिकाणे अॅड करा.
पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेल्या निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत मान्सूनमध्ये फिरण्याचा आनंद घेण्याच्या विचारात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुण्याजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. हिरवेगार डोंगर आणि धबधबे असलेले ही थंड हवेची ठिकाणं पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात.
यंदाच्या पावसाळ्यात बाहेरगावी फिरायला जाण्याआधी भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या. यामुळे तुमचा मान्सूनच्या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित होईल. मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये मान्सूनमध्यो जोरदार पाऊस पडतो. यामुळे येथील हिरवागार निसर्ग, डोंगररांगा आणि धबधबे हे दृश्य पाहण्यासारखं असते.
केरळमधील व्हॅली बॅकवॉटरसाठी ओळखलं जाणारं अलेप्पी हाऊसबोट क्रूझ हे पावसाळ्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील बॅकवॉटर ओव्हरप्लो होतो आणि आजूबाजूची हिरवळ आणखीनच हिरवीगार होते.
उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लावर्स हे राष्ट्रीय उद्यान आहे. येथे फिरण्यासाठी मान्सूनचा हंगाम सर्वात अनुकूल आहे. या काळात ही संपूर्ण घाटी अल्पाइन फुलांनी बहरते. त्यामुळे या काळात येथील वातावरण अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असते.
राजस्थानमधील उदयपूर तलावांचे शहर म्हणून ओळखलं जाते. शानदार महाल, तलाव, हिरवेगार बगीचे या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटा.पावसाळ्यात या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता.
पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेल्या निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्हीही ही संधी सोडू नका आणि यंदाच्या पावसाळ्याच फिरण्याचा मजा घ्या आणि आनंदी राहा