आयुष्याची गणितं सोडवणारे संदेश

National Mathematics Day 2023 : गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी दिलेत आयुष्याची गणितं सोडवणारे संदेश; कायम लक्षात 'हे' शब्द

आयुष्याचा खरा अर्थ

गणिताच्या भाषेतून आयुष्याचा खरा अर्थ उलगडणारे रामानुजन सांगतात, 'माध्यासाठी देवाचा विचार इतरांपर्यंत पोहोचवणं म्हणजेच समीकरण'.

स्वत:ची वाट

'मी कोणत्याही विद्यापीठातून पुढे आलेलो नाही, पण मी स्वत:ची वाट स्वत:च आखत चाललोय' - रामानुजन

प्राधान्य

'माझ्या मेंदूच्या संवर्धानासाठी मला आहाराची, पोट भरण्याची आवश्यकता आहे आणि हेच माझं प्राधान्य आहे'- रामानुजन

गणित म्हणजे...

रामानुजन यांच्याप्रमाणं या क्षेत्रातील इतर मंडळींनीसुद्धा असेच काही संदेश दिले. जसं, 'गणित म्हणजे समीकरण, पदावल्या नव्हे तर गणित म्हणजे एक समज आहे' असं विलियम पॉल थर्स्टन म्हणतात.

गणित हा एक खेळ

'गणित हा एक खेळ असून तो पेपरवर मिळालेल्या निरर्थक गुणांच्या बळावर काही सोप्या नियमांच्या आधारे खेळला जातो.'- डेव्हिड हिल्बर्ट

आजुबाजूला गणित

'गणिताशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही. तुमच्या आजुबाजूला गणित आणि आकडेच आहेत'- शकुंतला देवी

न सुटणारं कोडं?

गणित म्हणजे एखादा राक्षस किंवा एखादं न सुटणारं कोडं असं समजून तुम्हीही त्याकडे आणि जगण्याकडे पाहत असाल तर, वरील संदेश वाचून हा दृष्टीकोन बदला.

VIEW ALL

Read Next Story