भगवद्गीतेत दडलय यशस्वी जीवनाचं रहस्य, जाणुन घ्या...

श्रीमद् भगवद्गीतेत आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवर समाधानकारक उत्तर दिली आहेत. मानवाला जीवनात गीताज्ञान आजही मार्गदर्शक ठरत आहे.

भगवद्गीतेत कर्मयोगावर अधिक भर देण्यात आला आहे. श्रीकृष्णांनी केवळ कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका, असा उपदेश केला आहे.

भगवद्गीतेत सांगितलं आहे की, जो व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो तो कोणत्याही प्रसंगावर मात करुन विजय मिळवू शकतो.

प्रत्येकाला वेळेची किंमत असायला हवी. वेळेची किंमत आणि महत्त्व जाणून जो व्यवस्थापन करून जीवन जगतो त्याला कधीही अपयशाला सामोरं जावं लागत नाही.

स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणारे लोक जीवनात नेहमी यशस्वी होतात.

श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे आपल्या मनावर नियंत्रण आहे. त्याला जीवनात यशप्राप्ती पासून कुणीही अडवू शकणार नाही.

जीवनात ध्येय गाठण्याअगोदर स्वतःला समजून घ्या, स्वतःचे मूल्यमापन करणं गरजेचं आहे.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story