पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांच्यामध्ये गुंतवणूक केल्यामुळं गुंतवणुकदारांना चांगला नफा मिळतो.
अगदी त्याचप्रमाणं सरकारी गॅरंटी असणाऱ्या काही योजनांमध्ये सिंगल आणि जॉईंट अकाऊंटच्या सुविधा मिळतात. जिथं सिंगल अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख आणि जॉईंट खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करू शकता.
या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता. जॉईंट अकाऊंटच्या माध्यमातून तुम्ही या योजनेमध्ये 9250 रुपयांपर्यंतची कमाई करु शकता.
पती- पत्नीला या गुंतवणुकीतून फायदाच मिळतो. POMIS मध्ये जवळपास 7.4 टक्के दरानं व्याज मिळतं.
इथं जॉईंट अकाऊंटमध्ये 15 लाख रुपये डिपॉझिट केल्यास 7.4 टक्क्यांचं व्याज मिळतं. म्हणजेच एका वर्षाला 1,11,000 रुपये
पाच वर्षांमध्ये ही रक्कम 1,11,000 X 5 = 5,55,000 रुपये इतकी होते.