Smart Tips For Petrol-Pump

Smart Tips For Petrol-Pump : पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळायचीये? वापरा या सोप्या ट्रीक्स आणि टीप्स. देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक नवी नाही. अनेकदा ग्राहक म्हणून आपण जेव्हाजेव्हा पेट्रोल पंपावर जातो तेव्हा कळत नकळत आपली फसवणूक होते.

ग्राहकांची फसवणूक

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच ग्राहकांची फसवणूक केली जाते. यासाठी अनेक प्रकार लागू असतात. मग यातून स्वत:ची सुटका कशी करायची कशी?

सर्वात सोपा उपाय...

सर्वात सोपा उपाय म्हणजे, मीटरवर नजर ठेवणं. जिथं तुम्हाला 0 दिसेल. अनेकदा ज्यावेळी ग्राहकांची इथं नदरच नसते, तेव्हा तिथं ही वॅल्यू शुन्यावर न आणताच इंधन भरलं जातं.

0 चं महत्त्वं

शुन्य नसताना वाहनात इंधन भरल्यामुळं यामध्ये ग्राहकाचं नुकसान होतं. उदाहरणार्थ तुम्हाला 200 किंवा 300 रुपयांचं पेट्रोल भरायचं असेल आणि आधी कोणी 100 रुपयांचं पेट्रोल घेतलं असेल तर, या गोंधळात तुमची 100 रुपयांनी फसवणूक होऊ शकते.

एखादी ऑफर, किंवा ....

अनेकदा पेट्रोल भरत असताना आपलं लक्ष इतक गोष्टींकडे वळवलं जातं. एखादी ऑफर, किंवा तत्सम काही गोष्टी सांगितल्या जातात. एखादी व्यक्ती वाहनाच्या काचा स्वच्छ करण्यासाठीच येते.

लक्ष विचलित होतंय?

पेट्रोल पंपावर या सर्व गोष्टी तुमचं लक्ष मीटरपासून विचलित करण्यासाठी केल्या जातात. त्यामुळं अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणं उत्तम पर्याय.

तातडीनं सतर्क व्हा

वाहनामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर तुम्हाला ते दिलेल्या पैशांहून कमी आल्याचा जराही संशय येत असेल तर, तुम्ही तातडीनं ते पुन्हा मोजण्यास सांगू शकता.

तपासणी करा

पेट्रोल पंपावर यासाठी लीटरची मापं असतात ज्यामध्ये पंपावरील कर्मचारी वाहनातील इंधन काढून तुमच्यासमोर त्याची मोजणी करु शकतो.

चांगले पेट्रोल पंप

सहसा काही पेट्रोल पंप हे चांगल्या दर्जाच्या इंधनासाठी ओळखले जातात. त्यामुळं वाहनाच्या इंजिनला जपण्याच्या हेतूनं कायमच चांगल्या पेट्रोल पंपावरूनच वाहनात इंधन भरा.

VIEW ALL

Read Next Story