सध्या सोशल मीडियात सोलर गांधी, सोलj मॅन ऑफ इंडिया नावाने आयआयटी प्रोफेसरच्या फाटलेल्या मोज्यांचे फोटो व्हायरल होतायत.
दिल्लीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ते फाटलेल्या मोज्यांसह बसले होते. त्यांनी यावर दिलेल्या स्पष्टीकरणाने लोकांची मने जिंकली आहेत.
त्यांनी आपल्या लिंक्डइनवर लांबलचक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणतात, पृथ्वीसाठी सर्वकाही सिमित होत चाललंय.
'हा फोटो दिल्लीच्या फाइव्ह स्टार हॉटेलचा आहे. तिथे शांतता होती. हो, माझे मोजे फाटले होते. मला ते बदलायची गरज आहे, मी बदलेन. मला परवडेल पण पृथ्वीला नाही परवडणार'
'मी आता वस्तू विचारपूर्वक वापरतो. प्रोडक्टिव्हीटी वाढवण्यासाठी बेस्ट गॅजेट वापरतो. कार्बन फूटप्रिंटसाठी किमान वस्तूंचा वापर करतो.'
'ज्याप्रमाणे व्यावसायिकाला कमी गुंतवणुकीत जास्त फायदा हवा असतो. त्याप्रमाणे मी माझ्या वेळेचा प्रभाव अधिक करतो. ज्यामुळे मोठा बदल होऊ शकेल.'
या आयआयटी प्रोफेसरचे नाव चेतन सोलंकी असे आहे. जे एनर्जी सायन्स शिकवतात. ते मध्य प्रदेश सरकारचे सौर उर्जेचे ब्रॅण्ड अॅम्बेसिटर आहेत.
आयआयटी मुंबईच्या वेबसाइटनुसार, त्यांनी बेल्जियमच्या आयएमइसीमधून डाँक्टरेट डिग्री मिळवली आहे.
त्यांनी सौर उर्जेला चालना देण्यासाठी 20 राज्यांमध्ये 43 हजारहून अधिक प्रवास केलाय. यामुळे त्यांना सोलार मॅन ऑफ इंडिया, सोलार गांधी म्हणून ओळखले जाते.