स्वामी विवेकानंद प्रेरणादायी विचार,यश तुमच्याकडे चालून येईल!

उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका.

जेवढं जगाल तोपर्यंत शिका, अनुभव सर्वात श्रेष्ठ शिक्षक आहे.

आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल.

खरं असेल ते निर्भयपणे जगाला सांगा. त्याने कोणाला वाईट वाटत असेल तर त्याची काळजी करु नका.

स्वत:वर विश्वास नसेल तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.

ताकद जीवन आहे, कमजोरी मृत्यू आहे. प्रसरण जीवन आहे. आकुंचन मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर घृणा मृत्यू आहे.

चिंतन करा, चिंता नको. नव्या विचारांना जन्म द्या.

एकावेळी एक काम करा. ते पूर्ण आत्मसमर्पण देऊन करा.त्यावेळी बाकी सर्व विसरुन जा.

तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही, अध्यात्मिक बनवू शकत नाही. तुम्हाला स्वत:ला आतून शिकावे लागेल. आत्म्याशिवाय दुसरा शिक्षक नाही.

VIEW ALL

Read Next Story