जगातील 7 आश्चर्यांमध्ये असलेला ताजमहल आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो.
ताजमहलसंदर्भात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. पण यासंदर्भातील एक फॅक्ट जाणून घेऊया.
पर्यटकांसाठी ताजमहल पाहण्याची वेळ सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6.30 पर्यंत आहे. यानंतर येथे प्रवेश मिळत नाही.
पण रात्रीच्या वेळेस इथले सर्व दिवे बंद केले जातात आणि अंधार केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे का?
कीटक हे ताजमहलमधील लाईट बंद ठेवण्यामागचे महत्वाचे कारण आहे.
प्रकाशाकडे आकर्षित होणारे कीटक ताजमहलवर जमा होतात. येथेच ते मलमूत्र विसर्जित करतात.
किटकांनी केलेल्या घाणीमुळे ताजमहलच्या सौंदर्यावर परिणाम पडू शकतो. डागामुळे टाइल्स खराब होऊ शकतात.
भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या सुचनेनुसार, किटकांमुळे ताजमहलला नुकसान पोहोचू शकते.संगमरवरी दगडांवर हे निशाण राहतात.
त्यामुळे 1997 नंतर ताजमहलमधील दिवे संध्याकाळनंतर बंद ठेवतात.