तुमच्या ओळखीतही मत्स्याहार करणारे अर्थात मासेप्रेमी असतीलच. भारतातही मासे अतिशय आवडीनं खाल्ले जातात.
माशांच्या रस्स्यापासून तळलेल्या माशांपर्यंत असे एक ना अनेक पद्धतीचे पदार्थ तयार केले जातात.
किनारपट्टी क्षेत्राच्या नजीक राहणारी मंडळी मासळीचं सेवन मोठ्या प्रमाणात करतात असं म्हटलं जातं. भारतात दरवर्षी 11016 टन इतक्या मासळीचा खप होतो.
इतकं असूनही सर्वाधिक मासे खाणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांकत नसून, दुसऱ्याच आशियाई देशाचं नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
हा देश म्हणजे चीन. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू रिपोर्टच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये दरवर्षी 57474 टन इतक्या मासळीचा खप होतो.
चीनमधील नागरिकांची सर्वाधिक पसंती सॅल्मन माशाला असते. याशिवाय ते शिंपल्या आणि इतर प्रकारच्या Seafood लाही पसंती देतात.
सर्वाधिक मासळी खाण्याच्या यादीत इंडोनेशिया दुसऱ्या स्थानावर येणारा देश आहे. इथं दरवर्षी 12154 टन इतके मासे खाल्ले जातात.