भटकंतीची आवड असणाऱ्या कोणालाही विचारलं, की भारतातील स्वित्झर्लंड म्हणून कोणतं गाव प्रसिद्ध आहे? तर अनेक नावं समोर येतात.
मुळात भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी इथं स्वित्झर्लंड म्हणून ओळखली जातात. हिरव्यागार डोंगररांगा आणि हिवाळ्यात बर्फानं अच्छादलेले डोंगर अशा सुरेख निसर्गामुळं हे ठिकाण स्वित्झर्लंडशी फार मिळतंजुळतं वाटतं.
निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या आणि अगदी स्वित्झर्लंडमध्ये असल्याचं भासणाऱ्या या गावाचं नाव आहे, खज्जियार.
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात असणाऱ्या डलहौजी इथं हे लहानसं गिरीस्थान आहे.
भारतातील स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं आणखी एक ठिकाण म्हणजे मुन्सियारी. उत्तराखंडमध्ये हे गाव असून, इथं येणारे पर्यटकही भारावून जातात.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यालाही भारतातील स्वित्झर्लंड म्हटलं जातं.
काय मग, भारतात एकाहून अधिक स्वित्झर्लंडसम ठिकाणं आहेत, तुम्ही इथं कधी भेट देताय?