जगातील सर्वात महागडी ट्रेन भारतात असून ती भारतीय रेल्वे मार्फत चालवली जाते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे.
पाहूयात जगातील सर्वात महागड्या ट्रेन आणि या ट्रेनने प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीचं तिकीट किती आहे ते पाहूयात...
महागड्या ट्रेन्सच्या यादीत सहाव्या स्थानी वेनिस सिंपलन ओरिएंट ट्रेन ही युरोपमधील लक्झरी ट्रेन आहे. या ट्रेनचं तिकीट 3342 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 2 लाख 80 हजार 797 रुपये इतकं आहे.
या यादीत पाचव्या स्थानी पॅलेस ऑन व्हील्स ही भारतातील पहिली लक्झरी आणि हेरिटेज ट्रेन आहे. या ट्रेनचं एका व्यक्तीचं भाडं 4450 अमेरिकी डॉलर इतकं आहे. ही रक्कम 3 लाख 82 हजार 294 रुपये इतकी होते.
भारतामधील डेक्कन ओडिशी ट्रेन महागड्या ट्रेनच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. या ट्रेनमधून एकदा प्रवास करण्यासाठी 6734 अमेरिकी डॉलर मोजावे लागतात. ही रक्कम 5 लाख 65 हजार 795 रुपये इतकी होते.
डेन्यूब एक्सप्रेस ही मध्य आणि पूर्व युरोपमधील लक्झरी ट्रेन आहे. या ट्रेनचं तिकीट 9295 अमेरिकी डॉलर इतकं आहे. ही रक्कम 7 लाख 80 हजार 972 रुपये इतकी होते. ही ट्रेन यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
दुसऱ्या क्रमांकावर रशियामधील गोल्डन ईगल ट्रान्स-सायबेरियन एक्सप्रेस ही ट्रेन असून या ट्रेनचं तिकीट 16 हजार 995 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 14 लाख 27 हजार 932 रुपये इतकं आहे.
'ओरिएंट रेल जर्नी' या वेबसाईटनुसार भारतामधील 'महाराजा एक्सप्रेस' ही जगातील सर्वात महागडी ट्रेन आहे.
'महाराजा एक्सप्रेस' ट्रेनचं तिकीट 23,700 अमेरिकी डॉलर्स इतकं आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 19 लाख 91 हजार 291 रुपये इतकी होती.