भारतातील अनेक नद्यांना दैवतांचं स्थान प्राप्त आहे. एक नदी प्रवाहित होताना आजुबाजूच्या प्रदेशाचा कायापालट करत पुढे जाते. काही नद्या त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखल्या जातात. अशीच एक नदी देशात आहे, जिचं पाणी कधीच थंड होत नाही.
हे ठिकाण उत्तराखंडस्थित यमुनोत्री इथं आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकासाठीच हे मुख्य आकर्षण आहे तप्तकुंड. इथं सर्वात मोठ्या तप्तकुंडाचा जलस्त्रोत मंदिरापासून 20 फुटांच्या अंतरावर आहे.
केदारखंड वर्णित या ब्रह्मकुंडाचं नाव सध्याच्या घडीला सूर्यकुंड सांगण्यात येतं. याचं तापमान 195 फारनहाईट सांगण्यात येतं.
उत्तराखंडमध्ये असणाऱ्या या नदीतून प्रवाहित झालेल्या कुंडाच्या पाण्याचा विशिष्ट आवाजही येतो असं सांगितलं जातं. अनेकांच्या मान्यतेनुसार हा ओंकाराचा स्वर असतो.
अनेक भाविक इथं असणाऱ्या एका जागी बटाटे आणि पोतडीमध्ये बांधलेले तांदूळही शिजवतात.
वातावरण थंड असो किंवा मग पावसाचा मारा होत असो, उत्तराखंडमध्ये असणारं हे कुंड आणि त्यातील पाणी कायमच गरम असतं.
फक्त यमुनोत्री क्षेत्रच नव्हे, देशात इतरही अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं अशी गरम पाण्याची कुंड आहेत. आता यामागे विज्ञान आहे की आणि काही रहस्य ही बाब मात्र कुतूहलाचीच.