तुम्ही हरिद्वारसोबत इथे जायचा प्लॅन केलात एकदम उत्तम. ऋषिकेशमध्ये भगवान शंकराच्या मंदिरांसह अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
तुम्ही जर एखाद्या शांत ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर दार्जिलिंग उत्तम पर्याय आहे. चहाचा आस्वाद घेत इथल्या डोंगर रांगा पाहणं तुम्हाला नक्कीच सुखावेल.
गोवा हे सगळ्यांच्या डेस्टिनेशन लिस्टमध्ये नक्कीच असते. इथले समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वास्तू खूपच लोकप्रिय आहेत. (फोटो - Reuters)
तुम्हाला जर पुरातन वास्तूंचा अनुभव घ्यायचा असेल तर कर्नाटकातील हंम्पी हे उत्तम ठिकाण आहे. तरुणामध्ये हम्पीची मोठी क्रेझ आहे.
राजस्थानातील जयपूर हेसुद्धा सोलो ट्रिपसाठी खूपच लोकप्रिय असं ठिकाण आहे. इथे खरेदीसाठी तुम्हाला चांगली संधी आहे.
भारतातल्या सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले वाराणसी शहर अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. गंगा किनाऱ्यावर वसलेले हे शहरातील घाट आणि मंदिरे हे नक्कीच पाहण्यासारखी आहेत
द गोल्डन सिटी म्हणून ओळख असलेले जैसलमेर हे सोलो ट्रिपसाठी उत्तरम आहे. इथे राहण्यासाठी उत्तम सोय असून तिथल्या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत.