Aadhar Card biometric update : तुम्ही तुमच्या मुलाचे आधार कार्ड काढले आहे का? जर काढले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
UIDAI Aadhar Card : जर तुमच्या मुलांचे आधार कार्ड असेल तर लगेच बायोमेट्रिक अपडेट करा. तुम्ही ते अपडेट केले नाही तर निलंबित केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो.
तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड 5 वर्षे आणि 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काढले असेल, तर 7 वर्षे आणि 17 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक आहे.
तुम्ही लहान मुलांचे आधार कार्ड हे अपडेट केले नाही तर त्यांचे आधार निलंबित केले जाऊ शकते.
तसेच 7 वर्षे किंवा 17 वर्षे पूर्ण केलेली मुले किंवा किशोरवयीन मुलांना देखील डेटा अपडेटसाठी शुल्क द्यावे लागेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) त्यात ही नवी तरतूद केली आहे.
यापूर्वी मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. आता त्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवले जात आहेत.
7 वर्षे किंवा 17 वर्षे पूर्ण केलेल्या या वयोगटातील मुलांच्या पालकांच्या मोबाईल नंबरवर अपडेट करण्यासाठी पुन्हा एसएमएस पाठवले जात आहेत.