हिंदू धर्मात अशा अनेक मान्यता आहे की, ज्याचा उल्लेख शास्त्रात किंवा वेद पुराणात मिळत नाही.
यामध्ये श्वानाच्या रडण्याचा देखील समावेश आहे. श्वानाचे रडणे शुभ की अशुभ मानले जाते. एक्सपर्ट काय सांगतात?
सामान्यांच्या माहितीनुसार, जर रात्री श्वानाच्या रडण्याचा आवाज आला तर ती अशुभ घटना समजली जाते.
असं सांगितलं जातं की, रात्रीच्यावेळी श्वान ज्या जागेवर उभा राहून रडतो तेथे आत्मांची उपस्थिती असते. श्वानाला आत्मा दिसतो असं म्हटलं जातं.
श्वानाला भैरव देवाचे वाहन मानले जाते. श्वान शुभ की अशुभ अशा दोन्ही घटनांचे संकेत देतात.
श्वानाची वास घेण्याची क्षमता जास्त असते. अशावेळी जर पाळीव श्वान रडला तर असं म्हटलं जातं की, त्याने घरातील एखादी पूर्वज व्यक्ती पाहिली असेल.
रात्री श्वानाच्या रडण्याने लोकांना असा भाष होतो की, कुठे तरी कुणाचा मृत्यू झाला असेल.
या सगळ्या गोष्टींचा उल्लेख शास्त्र किंवा वेद पुराणात अजिबात नाही. पण हिंदू धर्मात याचा उल्लेख आहे.
हिंदू धर्मानुसार, श्वानाच रडणं अतिशय अशुभ मानलं जातं.