'भूत चतुर्दशी'

भारतात 'इथं' साजरा होते कधीही न ऐकलेली 'भूत चतुर्दशी'; यामागचं कारण तितकंच भन्नाट

दिवाळीतील अमावस्या

बंगाली भाषिकांकडून दिवाळीतील अमावस्येला काली पूजा केली जाते आणि याच दिवसाच्या एक दिवस आधी साजरा होते भूत चतुर्दशी. नावातूनच लक्षात येतं की हा अतृप्त आत्मांसाठीचा एक दिवस आहे.

लोककथा

अनेक लोककथांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार मृत्यूलोक आणि पृथ्वीलोकाची दारं या दिवशी खुली असतात. जेणेकरून मृत्यूलोकातील मंडळी पृथ्वीवर येऊ शकतील.

पृथ्वीलोक

या दिवशी पृथ्वीलोकाचं संरक्षण करण्यासाठी 14 दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. जेणेकरून नकारात्मक शक्तींपासन तुमचं कुटुंब सुरक्षित राहू शकेल.

धारणा

अमुक एका कुटुंबातील निधन झालेल्या व्यक्तींसाठीही हे दिवे लावले जाता. तर, काहींच्या धारणेनुसार हे दिवे मृत्यूदेवता यमासाठी लावण्यात येतात.

भारतातील हॅलोविन

थोडक्यात हा दिवस भारतातील हॅलोविन आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त धारणा वेगळ्या, या प्रथेचं पालन करण्याची पद्धत वेगळी. इतकाच काय तो फरक.

काली पूजा

ही झाली विनोदाची बाजू, पण पश्चिम बंगालमध्ये आजही हा दिवस साजरा केला जातो, त्याची लगबगही पाहायला मिळते आणि दुसऱ्या दिवशी धूम असते ती म्हणजे काली पूजेची.

VIEW ALL

Read Next Story