फक्त बॅटिंग, बॉलिंगच नाही तर 'या' ICC च्या या 8 Lists मध्ये भारतीय नंबर 1 वन

शुभमन गिल नंबर एक बॅट्समन

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल अव्वल स्थानी आला आहे.

बाबरला टाकलं मागे

शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकत हा पराक्रम केला आहे. अवघ्या 41 डावांमध्ये शुभमनने ही झेप घेतली आहे.

सिराज नंबर वन गोलंदाज

दुसरीकडे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही गोलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.

शाहीन शाह आफ्रिदीला मागे टाकलं

मोहम्मद सिराजने पाकिस्तानी वेगवाने गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला मागे टाकलं आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही भारतीय अव्वल स्थानी आहेत.

पॉइंट टेबलमध्ये अव्वल

वर्ल्ड कप 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ आपले 8 पैकी 8 सामने जिंकून पहिल्या स्थानी आहे.

भारतीय खेळाडू अनेक गोष्टींमध्ये अव्वल

मात्र केवळ वर्ल्ड कपच नाही तर इतर अनेक बाबतीत भारतीय अव्वल स्थानी आहे. भारतीय खेळाडू कशाकशात अव्वल आहेत पाहूयात...

कसोटीमध्येही अव्वल

सध्या भारतीय कसोटी संघ हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी संघ आहे.

ओडीआयमध्येही अव्वल

एकदिवसीय क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे.

टी-20 मध्ये नंबर वन

टी-20 मध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

कसोटीमधील नंबर एकचा गोलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये जगातील पहिल्या क्रमाकांचा गोलंदाज हा भारताचा रविचंद्रन अश्वीन आहे.

सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू भारताचाच

जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हा भारताचाच आहे. या खेळाडूचं नाव आहे रविंद्र जडेजा.

टी-20 मधील नंबर एकचा फलंदाज

टी-20 क्रिकेटमधील पहिल्या क्रमाकांचा फलंदाज हा भारताचा सुर्यकुमार यादव आहे.

क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा

यावरुनच भारतीय संघाचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा दिसून येतो.

VIEW ALL

Read Next Story